शिवरायांचे मावळे चमकत आहे

Monday, 30 July 2012

सिंहगड

।। सिंहगड ।।


नाव सिंहगड

उंची ४४००मी.

प्रकार गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी मध्यम

ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र,

भारत

जवळचे गाव सिंहगड

डोंगररांग भुलेश्वर

सध्याची अवस्था

सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र

राज्यातील एक किल्ला आहे.

कल्याण दरवाजा

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५

कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला

समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे.

सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या

भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन

पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि

दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून

कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड,

तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड

मुलुख या गडावरून दिसतो.

इतिहास


सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार

याचे आधीचे नाव कोंडाणा. पूर्वी हा किल्ला

आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे

आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे

इ.स. १६४७ मध्ये

दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर

कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर

याला लाच देऊन

शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात

आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले.

पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या

यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत

आदिलशहाला दिला. 


पुरंदरच्या तहात जे किल्ले

मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता.

मोगलांतर्फे उदेभान राठोड

हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता.

हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान

झाला होता..


सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि

शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे

विश्वासू सरदार आणि बालमित्र

तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी

(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी)

हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला.

या लढाईत तानाजींना वीरमरण आले

आणि प्राणाचे बलिदान देऊन

हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी

"गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले.

पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून

सिंहगड असे ठेवले.


सिंहगड

हा मुख्यतः तानाजी मालुसरे

यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

पहा सिंहगडाची लढाई


या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे

उल्लेख आहे.

तानाजी मालुसरा म्हणून

हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की,

'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे,

विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन

गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने

निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले.

गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की,

गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत

कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन,

हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे

माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले,

चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर

रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर

झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान

किल्लेदार खाशा त्याशी व

तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे

मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले.


तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली.

दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने

आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ

घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग

सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने

हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत

मारिले. किल्ला काबीज केला.

शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण

तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते

म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.

माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२

च्या रात्री हे युद्ध झाले.
















No comments:

Post a Comment