रतन गड
गडाची समुद्रसपाटीपासून उंची - ४२५५ फुट. वाट- भंदारादारा-रतनावाडी-रतनगड. जाण्याचा कालावधि - सप्टेम्बर ते में. (जास्त पावसात अवघड) गडावर जाण्यासाठी रतन वाडी पासून अंदाजे ३ तास लागतात. गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहान्मधे अंदाजे ३० ते ३५ लोक रहू शकतात. पुरेशी शिधा-सामुग्री घेउन गेल्यास मुक्कामाची सोय आहे. पाण्याची उपलब्धता असणारी ठिकाणे-
१ - वाघ तले (जातानाच्या वाटेवर.)
२ - राणीच्या बुरुजा शेजारील टाके.
३ - गडाच्या पठिमगिल अंधार कोठी.. गडावरील प्रेक्षनीय ठिकाणे -
४ - गणेश दरवाजा.
५ - रत्ना देवीची गुहा. (मंदीर)
६ - मुक्कामाची गुहा.
७ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
८ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
९ - कडेलोट पॉइंट.
१० - राणीचा हुडा (भग्न बुरुज)
११ - प्रवरेचे उगमस्थान.
१२ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज.
१३ - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
१४ - नेढ़ (गडावरील अत्युच्य ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
१५ - कल्याण दरवाजा. (यालाच सामरद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)
१६ - ग्रेट व्ह्यु ऑफ़ सह्याद्री.. रतन वाडी मधील प्रेक्षनीय-
१७ - अमृतेश्वर मंदीर. (हेमाडपंथी बांधनी व अप्रतिम कोरिवाकम)
१८ - अम्रुतेश्वराची पुष्कर्णी.
१९ - भंडारदारा धरणाचा सुंदर जलाशय.
२० - नौका पर्यटन. रतनवाडीसाठी एस.टी. बसेस ची वेळ.- सायं-७.भंडारदारा ते रतन वाडी (मुक्कामी गाड़ी ) परन्तु खाजगी वाहन जास्त सोइस्कर....
![]() |
Add caption |
![]() |
Add caption |
No comments:
Post a Comment