सुवर्णदुर्ग
सुवर्णदुर्ग -
रत्नागिरी जिल्ह्यामधल्या हर्णे बंदराजवळ असलेला हा एक अप्रतिम किल्ला..... साधारणत : १.६ किमी असेल अंतर...
हा किल्ला नक्की कोणी बांधला यात एकमत नाही... कोणी म्हणतं हा किल्ला सातवाहन राजांनी बांधला ( 230 BC to 220 AD) तर कोणी म्हणतं की बिजापुरचे सुल्तान अदिल शहानी बांधला..... (1490 to 1686).
पण एक मात्र खरं की हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अली अदिल शहा दुसरा याच्याकडुन जिंकुन घेतला आणि नंतर समुद्रातला शिवाजी या नावनी ओळखल्या जाणार्या कान्होजी आंग्रे यांना शाहु महाराजांनी १७१३ मधे हा किल्ला सोपावला.
किल्ल्याचा एकुण परिसर आहे साधारणतः ८ एकर एवढा...... आणि मुख्य जमिनीपासुन १.६ - २ किमी आत. जरी किल्ला हा रॉकी बीच ( मराठी शब्द ? ) वर असला तरी किल्ल्याच्या प्रवेश द्वारापाशी आपल्याला वाळु बघायला मिळते... तेवढाच एक पट्टा सँड बीच आहे...
किल्ल्यात तसं बघण्यासारखं काही खास राहिलेलं नाही पण बर्यापैकी पाण्याचे साठे उपल्ब्ध आहेत. विहिर, बावली ( पायर्यांवी विहिर ) आहेत पण पुरेशी काळजी न घेतल्यानी तिथल्या पाण्याचा रंग पण बघवत नाही इतकी अस्वच्छता आहे..... Sad
किल्ल्याच्या मागच्या म्हणजे समुद्राकडच्या तटबंदीवरुन लांबच लांब पसरलेला निळाशार समुद्र आकर्षित करुन घेतो.... त्याच्या फेसाळत्या लाटांनी तयार झालेला वेव्ह कट प्लॅटफॉर्म ( मराठी शब्द ? ) तर अप्रतिमच.....
हा किल्ला बाकीच्या किल्ल्यांपेक्षा दुर्लक्षीत आहे पण किल्ल्याची तटबंदी अजुन शाबुत आहे......
No comments:
Post a Comment